Home » ठळक बातम्या » प्रकाश गवळी यांची महाराष्ट्र राज्य ट्रक,टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड .

प्रकाश गवळी यांची महाराष्ट्र राज्य ट्रक,टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड .

प्रकाश गवळी यांची महाराष्ट्र राज्य ट्रक,टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड .

सातारा येथील अधिवेशन महासंघाचे मजबुतीसाठी अनेक ठराव मंजूर.

सातारा -महाराष्ट्राची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी सातारा येथील माजी नगराध्यक्ष तसेच याच महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कोंडीराम गवळी- सावकार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुढील काळासाठी ही निवड असून त्यांचे सोबत महासंघाचे पदाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यातील या महासंघाचे प्रतिनिधी सर्वश्री विजय यादव ,सुभाष जाधव, जयंत सावंत ,बाळासाहेब कटके, हर्ष कोटक, राजेंद्र रजपूत यांची निवड करण्यात आली .

सातारा येथील करंजे परिसरातील महासैनिक भवन येथे घेण्यात आलेल्या एक दिवसीय अधिवेशनामध्ये हा ठराव उपस्थित शेकडो महासंघाच्या प्रतिनिधींनी करून नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले .या अधिवेशनाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कैलासवासी मोहिंदर सिंग धुरा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सहकार्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी बाळासाहेब कलशेट्टी यांनी महासंघाची भूमिका याबाबत आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी जानकर यांनी केले .यावेळी राज्यभर महासंघाचे वतीने जिल्हास्तरावर अशी चर्चासत्रे व मिळावे घेऊन महासंघाच्या मजबुतीसाठी विशेष प्रयत्न करूयात याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .

यावेळी राज्य सरकारने चालकांच्या फिटनेस बाबत घातलेली बंधने यासाठी तूर्तास स्थगिती देण्यात आले असून वाहनांच्या स्पीड गव्हर्नरच्या बंधनासाठीही स्थगिती देण्यात आल्याची माहिती यावेळी अधिवेशनात देण्यात आल्यानंतर सर्व सदस्यांनी शासनाच्या या निर्णयाचे जोरदार घोषणाबाजी करून स्वागत करून महासंघाच्या वृद्धीसाठी विशेष घोषणा दिल्या.दुसऱ्या सत्रात दुपारी तीन ते सहा या वेळेत संघटना बांधणी त्याविषयी स्वरूप व रूपरेषा याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली .

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत सावंत यांनी केले ,तर आभार प्रदर्शन धनंजय कुलकर्णी यांनी केले. अधिवेशनाच्या सांगतेच्या वेळी महासंघाचे करिता विशेष योगदान देणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.

 या अधिवेशनात संपूर्ण राज्यातून सर्व जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी ,प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket