प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन
आज २६ जानेवारी रोजी भारतातील ७६ वे गणराज्य दिन साजरा करण्यात आला. यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शिवकृपा सहकारी पतपेढी चे व्हाईस चेअरमन चंद्रकांत वंजारी, संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.
यशोदा पब्लिक स्कूलच्या शालेय मुलांच्याकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये परेड, गीत गायन, नृत्य आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर आधारित विविध रंगमंच प्रदर्शन झाले. याव्यतिरिक्त ध्वजारोहण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित कलाकृतीने सर्वांचीच मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री चंद्रकांत वंजारी यांनी संविधानावर आणि देशाच्या सार्वभौमतेवर विशेष प्रकाश टाकला. “गणराज्य दिन ही आपली एकजूट आणि संविधानावर असलेली निष्ठा दर्शवते,” असे ते म्हणाले, उपस्थितांनी एकवटून संविधान आणि राष्ट्रध्वजाला सन्मान दिला.सर्वत्र आनंद आणि सन्मानाचे वातावरण होते. दरम्यान यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव उंचावले, ज्यामध्ये स्केटिंग, बॉक्सिंग, तबलावादन तसेच चित्रकला स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
गणराज्य राष्ट्रपती असणारी श्रद्धा आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी विद्यार्थी दशेमध्ये संस्कार होणे गरजेचे. अशा प्रकारचे राष्ट्रीय सण विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळवून देण्यासाठी आणि त्यांची राष्ट्रपतीची निष्ठा वाढवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी देशाविषयीची भावना ही उल्लेखनीय होते.
गणराज्य दिनाच्या या सणाने देशात एकजुटीचा संदेश दिला आणि प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्यावर प्रकाश टाकला. यावेळी यशोदे इन्स्टिट्यूट चे सल्लागार समितीचे सदस्य श्री संजय मोरे, श्री संजय शेलार, श्री कनुभाई भूपतणि, श्री लोणारे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी यशोदा इन्स्टिट्यूट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
