Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली अत्याधुनिक रुग्णवाहीका नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आरोग्याची सुविधा

सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली अत्याधुनिक रुग्णवाहीका नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आरोग्याची सुविधा 

सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली अत्याधुनिक रुग्णवाहीका नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून आरोग्याची सुविधा 

भुईंज (महेंद्र जाधवराव )आनेवाडी ते मेरूलिंग पर्यंत च्या ग्रामस्थांच्या आरोग्य सेवे करीता नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक रुग्णवाहीका उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांना वेळेत आणि चांगल्या प्रकारची सेवा मिळणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले, या रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहोळा सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका टकले, जावली बाजार समितीचे संचालक मच्छिन्द्र मुळीक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला 

          जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा करून सायगावचे ग्रामस्थ सागर निकम यांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी रुग्णवाहीका मंजुरी करीता प्रयत्न केले जावळी तालुक्यातील कुसुंबी, मेढा, केळघर, कुडाळ या आरोग्य केंद्राना या आधीच रुग्णवाहीका मिळाल्या होत्या मात्र सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे स्वतःची रुग्णवाहीका नसल्याने आरोग्य केंद्रात आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला सातारा या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करताना मोठी समस्या होत होती या रुग्णवाहीकेमुळे भागातील रुग्णांना याचा चांगला लाभ मिळेल याभागा करीता नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे योगदान मोठे असून वेळोवेळी त्यांनी सायगाव विभागासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिन्द्र मुळीक यांनी केले 

    या कार्यक्रमासाठी प्रविण देशमाने, विजयानंद साखरे,डॉ. विकास फरांदे, समाधान गायकवाड, संजय निकम, शरद निकम,श्रीकांत मुसळे,निलेश गायकवाड, स्वप्नील डोंबे, पृथ्वीराज कदम, संजय जेधे,मनोज तावरे, अंकुश शिवणकर,दिपक देशमाने सागर सावंत संतोष मोरे स्वाती वसावे पांडुरंग माहोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 93 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket