पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील
पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याच समजलं होत. वडिलांना हाय शुगर, त्यांच्या ऑपरेशनसाठी, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून तिने कधी २५ हजार तर कधी ५० हजार रुपये असे कृष्णा कनोजा याच्याकडून तब्बल ४ लाख रुपये घेतले होते. तिची मागणी थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला. शेवटी काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना भेटला तो गेला तेव्हा त्यांनी आपली कसली शस्त्रक्रिया झाली नाही की शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे वडिलांनी सांगितले. आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना मनात घेऊनच त्यातूनच तो तिला उसने घेतलेले पैसे परत मागत होता. तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दुःखातून त्याने कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव घातला. त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या.
ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच तिचा मृत्यु झाला. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मृत्यू पावलेल्या शुभदा या मुळच्या कराड येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी शुभदा कोदारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आरोपी कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात त्यांचा उजवा हात निखळला. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. सुमारे दोन वर्षापूर्वी वडिलांच्या उपचारासाठी उसने म्हणून घेतलेले चार लाख रुपये संबंधित तरुणीने परत केले नाहीत. तसेच वडिलांच्या उपचारासाठी देखील तिने हे पैसे घेतले नव्हते या रागातून तरुणीवर हल्ला करण्यात आला.