तिरुपती बालाजी मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी चार भाविकांचा मृत्यू
प्रतिनिधी -प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर येथे टोकन घेण्यसाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच चेंगराचेंगरी होऊन चार भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 6 भाविकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते. बैरागी पट्टिडा पार्क येथे भाविकांना रांगा लावण्याची परवानगी असताना ही घटना घडली. वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले असून, त्यामुळे टोकनसाठी हजारो नागरिकांची गर्दी होत आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील