Home » गुन्हा » थंड पाचगणीत पुन्हा छमछम ! हॉटेल हिराबागवर पोलिसांचा छापा

थंड पाचगणीत पुन्हा छमछम ! हॉटेल हिराबागवर पोलिसांचा छापा 

थंड पाचगणीत पुन्हा छमछम ! हॉटेल हिराबागवर पोलिसांचा छापा 

पाचगणी प्रतिनिधी – पर्यटनदृष्ट्या जागतिक महत्त्व असणाऱ्या पाचगणीसारख्या पर्यटनाच्या ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणून त्यांना संगीताच्या तालावर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेल्यांवर सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला.जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पाचगणीचे सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार यांनी खास खबऱ्यामार्फत व खास पथकामार्फत माहिती घेतली.तेव्हा पांचगणी, भिलार, कासवंड तसेच पाचगणी येथील हॉटेल हिराबाग हॉटेलच्या हॉलमध्ये गायिकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालकाने वेगवेगळ्या ठिकाणाहुन 12 महीला आणल्या असून या बारबाला संगीताच्या तालावर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेबाबत समजली.

सहायक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार बालाजी सोनुने, सहायक फौजदार रविंद्र कदम, हवालदार श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार, सचिन बोराटे, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे, सुमित मोहिते, रेखा तांबे हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना झाले आणि रात्र होताच पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) च्या हॉलमध्ये छापा टाकला.

तेव्हा या हॉटेलच्या हॉलमध्ये 12 बारबाला आळीपाळीने येऊन उत्तान कपडयात तेथील 20 गि-हाईकांच्या समोर उभ्या राहून, बिभत्स हावभाव करुन, गि-हाईकांच्या जवळ जावुन त्यांच्याशी लगट करीत असल्याचे दिसले. या बारबालाच्या या कृत्यावर गि-हाईक आनंद घेत त्यांचे सोबत नृत्य करीत होते. पोलीसांनी छापा टाकला आणि 20 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेल मालकासह इतर 20 लोकांवर गुन्हा दाखल केला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 556 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket