वाई मध्ये एमआयडीसीतील एटीएम चोरट्यांनी फोडले एटीएम मधील १७ लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या एटीएम वर अज्ञात चोरट्यांच्या टोळीने कटरच्या साह्याने तोडफोड करून त्यातील १७ लाखांची रोकड लंपास केल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत.आरोपींचा शोध घेण्यासाठी वाईच्या डिबी ची टिम आणी सातारा येथील एलसीबीची टिम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
सविस्तर वृत्त असे की वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालया शेजारी एक एटीएम आहे.तेथील एटीएमचा लाभ एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांना होत होता . हे एटीएम सकाळी सात वाजता उघडायचे व रात्री ११ वाजता तेथील शटरला कुलपे लावुन बंद केले जात होते.
तेथील एटीएम वर चोरट्यांच्या टोळीची करडी नजर होती दि. ८ च्या रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पडली आणी
चोरट्यांच्या टोळीने चक्क कटरच्या साह्याने त्या एटीएम तोडफोड करून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती वाई पोलिसांना सकाळी मिळाताच
वाई पोलिस घटनास्थळी पोहचले. या गंभीर घटनेची माहिती एकत्रीत करून ति जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना कळविण्यात आली.त्यानी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर आणी सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना घटना स्थळावर पाठवले . यावेळी वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम परिविक्षाधीन डिवाय एसपी शाम पानेगावकर वाईचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे वाई डिबीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांची टिम उपस्थित होती .या सर्व पोलिस यंत्रणेला अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी तपास कामासाठी मार्गदर्शन केले.
या घटनेचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्या घटनेचा अधिक तपास सुधीर वाळुंज हे करत आहेत.