Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात बांधकामांच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त

साताऱ्यात बांधकामांच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त 

साताऱ्यात बांधकामांच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त 

 सातारा :सातारा शहरामध्ये बांधकामे उदंड झालीत. त्यामुळे रस्त्यावर सिमेंट, वाळू, खडी, माती यांचे थर जमा झाल्यामुळे सातारकरांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे. एकतर रोज बदलणारे वातावरण कधी थंडी तर कधी उकाडा असे सतत बदलत आहे त्यामुळे सर्दी खोकला होत आहे व त्यात या बांधकामची धूळ यामुळे प्रदूषणात भयंकर वाढ झाली आहे.

        सातारा शहरातील स्टॅन्ड आणि स्टेडियम परिसरात असणाऱ्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात धुळीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुरळा झाला आहे. त्याचा दुष्परिणाम भोसले मळा व करंजे परिसरातील लहान मुले व वृद्ध रहिवासी यांना होत आहे.

शहरी भागातील दाट लोकसंख्येमुळे बांधकामादरम्यान ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. अवजड यंत्रसामग्री, विध्वंस आणि सामग्रीची वाहतूक उच्च पातळीचा आवाज आणि धूळ निर्माण करू शकते, ज्यामुळे जवळपासच्या रहिवाशांवर आणि व्यवसायांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.शहरी बांधकामाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आधुनिक, शांत उपकरणे वापरणे आणि धूळ दाबण्याच्या उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ध्वनी अडथळे, ध्वनीरोधक साहित्य आणि कमी पातळीच्या ध्वनी आणि उत्सर्जनासाठी डिझाइन केलेली प्रगत यंत्रसामग्री समुदायातील व्यत्यय कमी करण्यास मदत करत आहेत. यासाठी बिल्डरांनी या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विकासकांनी रोज पाणी मारून रस्ते धुतले पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे. बांधकाम तुमची आणी आमच्या आरोग्याशी खेळ का असा सवाल नागरिक करत आहेत. वारंवार सांगूनही ते रस्त्यावर पाणी मारत नाहीत तोंडी सांगून पालथ्या घड्यावर पाणी झाले आहे.

      प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातारा नगरपालिका यांचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. प्रशासनाने लक्ष घालून सदर परिसर प्रदूषण मुक्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

Post Views: 10 हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब

Live Cricket