Home » ठळक बातम्या » रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांचा गरजू रुग्णांसाठी अभिनव उपक्रम !

रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांचा गरजू रुग्णांसाठी अभिनव उपक्रम !

रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांचा गरजू रुग्णांसाठी अभिनव उपक्रम !

गेली पाच दशके रुबी हॉल विविध माध्यमातून रुग्णांची अव्याहतपणे सेवा करत आहे. एमआरआय/सीटी स्कॅन यासारख्या सुविधा प्रथमतः रुबी हॉलनेच दिल्या. महाराष्ट्रातील अनेक शहर व ग्रामीण भागात अत्याधुनिक एमआरआय/सीटी स्कॅन सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. ही सेंटर्स रुणांना नव संजीवनी ठरली आहेत. रुबी हॉल तर्फे सातारा व आसपासच्या तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी सीटी स्कॅनची एक सवलत योजना जाहीर केली आहे. मेंदू, कान, नाक, घसा यांचे सीटी स्कॅन अतिशय अल्प दरात (रु. २०००/-) मध्ये करण्यात येणार असून, ३ डी जॉईंट सीटी स्कॅन फक्त रु. ४०००/- करण्यात येणार आहे. इतर तपासण्यासुद्धा सवलतीच्या दरात होणार आहेत तसेच अॅन्जिओग्राफी फक्त रु. ८५०० मध्ये केली जाणार आहे. या सर्व सवलत योजना फक्त शनिवार, रविवार सकाळी १० ते ५ या वेळेतच करण्यात येणार आहेत. तरी या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

Post Views: 10 हृदयविकार रुग्णांसाठी दिनांक ९ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब

Live Cricket