Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » प्रतिक’ कवितासंग्रह तरुणांना व जेष्ठांना वाचनीय-लोकनेते रामशेठ ठाकूर

प्रतिक’ कवितासंग्रह तरुणांना व जेष्ठांना वाचनीय-लोकनेते रामशेठ ठाकूर 

प्रतिक’ कवितासंग्रह तरुणांना व जेष्ठांना वाचनीय-लोकनेते रामशेठ ठाकूर 

साताऱ्यात शशिकांत बडेकर यांच्या ‘प्रतिक’ कवितासंग्रहाचे प्रकाशन 

सातारा : ‘ सातारा येथील कवी शशिकांत बडेकर यांच्या कवितेत ,निसर्ग ,प्रेम ,सामाजिक वास्तव व ऋणानुबंध इत्यादी विविध प्रकारचा आशय आलेला असून, आयुष्यात वेदना असल्यातरी दुःखातून सुद्धा माणसाने कसे बाहेर पडावे असा विचार आलेला आहे. बडेकर आशावादी कवी आहेत,संवेदनशील कवी माणूस आपल्या प्रतिभेने व्यक्तिगत जीवनात व समाजात घडणाऱ्या घटना सुंदर शब्दात कसा टिपतो हे त्यांच्या कविता वाचून दिसून येईल. आजच्या युगातील भावनिक कविता असणारा हा ‘प्रतिक’ कवितासंग्रह तरुणांना तसेच जेष्ठाना वाचण्यासारखा व अनुभवण्यासारखा आहे , हा कविता संग्रह लोकप्रिय होईल अशा शुभेच्छा मी देतो’ असे उदगार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज येथे शशिकांत बडेकर यांच्या ‘प्रतिक ‘या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,अमोल उनउने, इत्यादी उपस्थित होते 

      कवी शशिकांत बडेकर कविता संग्रहनिर्मिती संदर्भात बोलताना म्हणाले की , लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचे सहकार्य झाल्यानेच माझा कवितासंग्रह तयार झाला.. मला मामाच्याकडून वंश परंपरेने मिळालेली ललित साहित्याची देणगी मिळाली असावी असे वाटते. लहानपणापासून वाचनाची लिहीण्याची आवड होती यांमुळे ललित साहित्य वाचनात गोडी वाटू लागली. विशेषतः माझी आई जात्यावरील गीत म्हणत असायची त्यावेळी शब्दांची गेयता ,रचना इत्यादी बारकावे कळत गेले. मामाचे ललित साहित्य जवळून पाहिले आणि त्याच प्रेरणेतून पुढे लिहित राहिलो हा प्रवास जवळजवळ ५० वर्षे चालू होता. माझ्या जीवनात आलेल्या अनेक दुःखातून माझ्या कविता उत्कटरुपात व्यक्त झाल्या .माझा मुलगा प्रतीकच्या जाण्याने माझ्या मनाची खूप होरपळ झाली. व्यक्तिगत आयुष्यात दुःख भरून राहिले. आणि अचानक छत्रपती शिवाजी कालेज सातारा मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ सुभाष. वाघमारे सरांची ओळख झाली. मनातील भावभावना.त्यांच्याशी बोललोआणि त्यांनी मला हे साहित्य लेखन ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. आर्थिक प्रश्न निर्माण झाला मग मी मुंबईच्या वास्तव्यास असताना तेथील मा.खा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमात समाविष्ट होत गेलो होतो.ओळखी वाढल्या. त्यानंतर मी खारघर येथे जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्षपदावरुन सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा वेगवेगळ्या प्रकारे काम करत असताना मा. खा.रामशेठ ठाकूर साहेबांच्या कार्यकर्तृत्वाने भारावून गेलो. मग मी कविता संग्रह छापण्याची कल्पना त्यांचे जवळ मांडली तेव्हा त्यांनी मला सर्वतोपरी अनमोल सहकार्य केले आणि त्यातूनच माझा कवितासंग्रह पूर्णत्वास आला. साहित्यवेल प्रकाशन सातारा यांनी प्रकाशन करण्यासाठी सहकार्य केले. तसेच मुद्रक कृष्णा चिंचकर,तसेच मुद्रितशोधन करणारे डॉ.संजयकुमार सरगडे यांनी सहकार्य केले.कवितासंग्रह निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांचे मार्गदर्शन व करुणाशील, कर्णासारखी दानत अंगीकारलेले रयतेचे कल्याणकारी दानशूर असे लोकनेते मा.रामशेठ ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद व खंबीर आधार यातूनच माझ्या भावनांना कवितेला जनमनात जाण्याची वाट मिळाली आहे. पनवेल महा नगरपालिकेचे माजी सभापती हरेश मनोहर केणी यांचेही बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे. या कविता संग्रहाने माझे नशीबच बदलून गेले आहे असे मला वाटते अशा भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. या छोटेखानी कार्यक्रमास अमृत माने,गणेश बडेकर,अनिकेत भिसे,हर्ष सायनाकर, पत्रकार प्रकाश वायदंडे ,शुभम जाधव ,निखील खरात,बाबू बडेकर ,संदीप बडेकर ,आणि राज बडेकर,शिरीष जंगम इत्यादी हितचिंतक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 558 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket