Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » डॉ.श्रीपाल सबनीस हे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व – चंद्रकांत दळवी

डॉ.श्रीपाल सबनीस हे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व – चंद्रकांत दळवी

डॉ.श्रीपाल सबनीस हे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व – चंद्रकांत दळवी

             पुणे, दि. १ ( प्रतिनिधी) :- माणूस जितका मोठा होतो तितका तो सामान्यांना अनुपलब्ध होतो, मात्र डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या बाबतीत मात्र उलटे झाले असून ते सर्व सामान्यांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन भा.प्र. से. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.

                 दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा आयोजित यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित तसेच शिरीष चिटणीस संपादित डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते येथील नवी पेठ, पत्रकार भवन येथे पार पडला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षण तज्ञ अ. ल. देशमुख हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भा. प्र. से. पुणे विभाग माजी अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे, दैनिक केसरी या वृत्तपत्राचे सहसंपादक रामदास नेहुलकर, संस्कार मंदिर संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय, वारजे माळवाडी सहयोगी प्राध्यापक स्वप्निल गायकवाड, डॉ. सबनीस यांच्या पत्नी ललिता सबनीस, शिरीष चिटणीस, प्रा. रूपाली अवचरे, निखिल लंभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

                चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले, सबनीस सरांनी ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर सव्वा वर्षात त्यांनी ३८० कार्यक्रम केले. सरांनी ६३ वैचारिक ग्रंथ लिहिलेले आहेत. तसेच सरांना एकूण पस्तीस पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य संमेलन हा त्यांचा जगण्याचा भाग आहे. सबनीस सर वादळी व्यक्तिमत्व असून खूपच अप्रतिम असे ते काम करत आहेत. सबनीस सरांचे पुस्तक लिहिणे हाच त्यांचा खरा सन्मान आहे. यामध्ये संपादक शिरीष चिटणीस व त्यांची दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था साहित्य क्षेत्राच्या पाठीमागे उभी राहते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यशोदीप पब्लिकेशन्स पुणे यांचाही खूप मोठा वाटा आहे. साहित्याची सेवा डॉ. सबनीस यांच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षा चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली. मला अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर सबनीस सरांच्या बरोबर बसण्याची संधी मिळाली. सरांच्या वडिलांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी जो लढा उभारला तोच वारसा सरांनी पुढे नेला. ते प्राध्यापक म्हणून धुळे जिल्ह्यात लागले. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यावेळी त्यांनी लढा दिला. परिसरातील दुःख, दैन्य,अन्याय यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्राध्यापक असताना काम केले. त्याबरोबरच त्यांचे लिखाणही सुरू होते.

                    अ. ल. देशमुख म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून मी डॉ. श्रीपाल सबनीस यांची भाषणे ऐकतोय. त्यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी राजे आणि ब्राह्मणे तर वाद विवेक वादी भूमिका हे पुस्तक तसेच हिंदुत्व, बंधुत्व आणि मोदी ही पुस्तके मी वाचलेली आहेत. सबनीस सर म्हणजे आपल्याबरोबर चालता बोलता जिवंत असा ज्ञानकोश आहे असे मला म्हणावेसे वाटते. आपण सर्वांनी त्यांना साहित्यरत्न ही पदवी बहाल करूया असे आवाहन त्यांनी केले.

                श्याम देशपांडे म्हणाले, जीवन निष्ठेबद्दल प्रामाणिक असणे, शोषित वर्गाबद्दल कणव असणे या बाबी सबनीस सरांच्या मध्ये असून जीवन निष्ठेची किंमत चुकवावी लागते, ती सबनीस सर यांनी चुकवलेली आहे.

                रामदास नेहुलकर म्हणाले, विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस हे पुस्तक शिरीष चिटणीस यांनी अत्यंत सुंदरपणे संपादन केलेले आहे. सबनीस सरांनी नवोदित लेखकांना प्रेरणा दिलेली आहे. सामाजिक प्रबोधन हाच त्यांच्या लेखनाचा हेतू राहिलेला आहे. माणसात मिसळणारा साहित्यिक असे सबनीस सरांचे व्यक्तिमत्व आहे. या ग्रंथाचे शिरीष चिटणीस यांनी संपादन नेटकेपणाने केलेले आहे.

                  स्वप्निल गायकवाड म्हणाले, डॉ. सबनीस सर व ललिता सबनीस हे माझ्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आहेत असे मी मानतो. हल्लीच्या काळात लोकांचा भावनांक कमी होत चाललेला आहे अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले, सबनीस सरांच्या नावावर ७६ ग्रंथ आहेत. ४५० पेक्षा जास्त पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. सबनीस सर मानवतावादी आहेत. कोणतेही महापुरुष हे साध्य नाही तर ते साधन असतात, हे सरांनी आपल्याला सांगितले आहे.

                  शिरीष चिटणीस म्हणाले, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था कोणत्याही जाहिराती साठी खर्च करत नाही. जाहिरातीचा खर्च आम्ही कार्यक्रमासाठी करतो. आपल्या प्रबोधनाने, लेखनाने, वक्तृत्वाने प्रसिद्ध असलेले डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या आत्मचरित्रांमधून समाजाची प्रबोधन होण्याचे काम होत असते. आपण जे विचार करतो त्याला वेगवेगळे पैलू असतात. डॉ. सबनीस यांचे तरुण पिढी विषयी काय विचार आहेत हे गौरव ग्रंथाच्या माध्यमातून समोर येईल. ही सगळी व्यासपीठावरील मंडळी वेगळ्या पद्धतीतून समाज प्रबोधन करीत आहेत. चांगल्या माणसाचे लेखन समाजासमोर आले पाहिजे, उद्देशानेच सबनीस सरांचे पुस्तक मी संपादित केले आहे.

                प्रा. रूपाली अवचरे म्हणाल्या, यशोदीप पब्लिकेशन्स पुणे तर्फे पुस्तक प्रकाशित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी सबनीस सरांच्या कुटुंबातील एक सदस्य झालेली आहे. सरांच्या कडे माणूस जोडण्याची कला चांगल्या प्रकारे असून ते नवोदित लेखकांनाही नेहमीच प्रेरणा देण्याचे काम करतात. या पुस्तकासाठी माझा भाऊ निखिल लंभाते याचेही मोठे सहकार्य मला लाभले आहे. या पुस्तकाने मला निर्मितीचा आनंद दिलेला आहे.

                डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ईश्वराला मानणारी सातशे कोटी लोक आहेत. तसेच दुहेरी निष्ठा ठेवणारी माणसे जगामध्ये भरपूर आहेत. मी मार्क्सवादी, कम्युनिस्ट होतो. नंतर आंबेडकरवादी झालो. नंतर समाजवादी झालो. मी चांगुलपणाची बेरीज करायला शिकलोय. सर्व धर्माच्या चांगुलपणाची बेरीज करून त्यामध्येच मी रमलेलो आहे. मला जगण्याची प्रेरणा तुमच्या ऋणाने मला दिलेली आहे. संचिताची बेरीज करण्यामध्ये मला रस आहे. सामान्यातल्या सामान्यांमध्ये जे समाधान आहे ते मोठ्यात नाही, असेही त्यांनी सांगितले.

                  कार्यक्रमास रावसाहेब पवार, जे. पी. देसाई, माधव राजगुरू, शिरीष रायरीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार स्वप्निल पोरे यांनी केले. आभार शिरीष चिटणीस यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 566 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket