Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » शाळा हे संस्कार देणारे विद्यापीठ -डॉ.दिलीप गरुड

शाळा हे संस्कार देणारे विद्यापीठ -डॉ.दिलीप गरुड 

शाळा हे संस्कार देणारे विद्यापीठ .डॉ. दिलीप गरुड 

लोकमंगल हायस्कूलमध्ये रंगले दहावे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन. 

सातारा.ता.3 शाळा हे संस्कार देणारे विद्यापीठ असते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थी घडवला जातो असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद पुणे चे कार्यवाह डॉ.दिलीप गरुड यांनी केले. सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूल येथे आयोजित दहाव्या अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी डॉ.गरुड बोलत होते.

यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणून विश्वेश स्वामी माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती. यावेळी शिरीष चिटणीस अध्यक्ष लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था , शिल्पा चिटणीस सचिव लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था व अध्यक्ष अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद शाखा सातारच्या अध्यक्षा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सतीश पवार संचालक लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर यांची ही उपस्थिती होती. 

 डॉ.गरुड पुढे म्हणाले शालेय जीवनामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. ज्या गोष्टी आवडतात त्यामध्ये आवर्जून भाग घेतल्यास आपले जीवन समृद्ध होत असते. डॉ. गरुड यांनी आपल्या भाषणात विविध छोट्या-मोठ्या लहान गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना खळखळून हसवले.

   संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना विश्वेश स्वामी म्हणाले शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी घडलो. आदर्श व्यक्तिमत्व घडण्यासाठी कष्टाची गरज असते. शिक्षकांच्या शाब्बासकी ची थाप पडल्या मुळेच विद्यार्थी पुढे जात असतो यासाठी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी कष्ट करून पुढे गेले पाहिजे. कष्टाच्या सवयीमुळे आपण चांगला माणूस म्हणून उदयास येऊ शकतो. 

  शिरीष चिटणीस म्हणाले लोकमंगलच्या तीनही शाळांमध्ये आपण अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करत असल्याने याच्या तून विद्यार्थी घडत आहे. विद्यार्थी मोठा झाला की शिक्षकांना आनंद होतो. विद्यार्थ्यांनी जिद्दीने काम केल्यास ते मोठे होऊ शकतात. शाळेत तयार झालेली हस्तलिखिते भविष्यात दिशादर्शक ठरतात. विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे यासाठी कोणतेही काम छोटे अथवा मोठे न मानता येईल ते काम करत राहिले पाहिजे यासाठी कष्टाची तयारी असणे अत्यंत आवश्यक आहे. 

   शिल्पा चिटणीस यांनी आपल्या मनोगतातून बालकुमार साहित्य संमेलनाचे महत्त्व विशद केले. बालकुमार साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी सामाजिक, सांस्कृतिक जाणीव वाढीस लागतात या जाणिवेतून विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी काम करतो. वक्तृत्व, कथाकथन, मी वाचलेले पुस्तक यासारख्या स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थी घडतो. 

   संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या बालकुमार साहित्य संमेलनात कथाकथन, गाणी, गोष्टी तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. 

  कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक भगवान जाधव , शशिकांत जमदाडे,नंदा पवार, विजय यादव, उदय जाधव, गुलाब पठाण, काकासो निकम , बाळकृष्ण इंगळे, संगीता कुंभार, प्रतिभा वाघमोडे, यश शिलवंत, देवराम राऊत, चंद्रकांत देवगड उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाडीले व अभिजीत वाईकर यांनी केले. उपस्थिताचे आभार भास्कर जाधव यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बीड येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

Post Views: 255 बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बीड येथील

Live Cricket