राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » रविवार पेठेतील खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्ये निमित्त भंडारा

रविवार पेठेतील खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्ये निमित्त भंडारा 

रविवार पेठेतील खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्ये निमित्त भंडारा 

विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन 

सातारा,(प्रतिनिधी) : येथील रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर सालाबाद प्रमाणे श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने ऐतिहासिक खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादरूपी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने भंडाऱ्याच्या आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवार, दि. ३० रोजी सोमवती अमावस्येचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.

 त्यामध्ये पहाटे साडेसहा वाजता श्रीक्षेत्र संगम माहुली येथे देवास अभ्यंग स्नान घालण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेसात वाजल्यापासून पोवई नाक्यापासून भव्य पालखी व मिरवणूक सोहळा काढण्यात येईल. त्यानंतर साडे दहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर दुपारी अकरा वाजता पूजा व होम हवनास प्रारंभ होईल. दुपारी साडेअकरा पासून वाघ्या मुरळीचा पारंपारिक कार्यक्रम होणार असून दुपारी एक पासून महाप्रसाद अर्थात भंडाऱ्यास सुरुवात होईल. रात्री आठ वाजता महाआरती होणार असून या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket