Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात

खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात

खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात

सातारा : पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतुक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने होत असलेला बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. दळणवळणाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प नव्या वर्षी कार्यान्वित होणार आहे. साताऱ्यातील हा सर्वात हायवे वरचा मेगा प्रोजेक्ट असून 2025 च्या नव्या वर्षात हा हा बोगदा वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पुणे बंगळूर हायवे वरील खंबाटकी घाट हा वाहतुकीचा एक महत्वाच भाग आहे. या मार्गावरील दळणवळण व वाहनांची संख्या वाढल्याने खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतीमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला.

 

सध्या पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घाटवाटेने जावे लागते. हे आठ किमी अंतर जाण्यास सुमारे ३५ ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. परंतु बऱ्याचदा अपघात, एखादे वाहन नादुरुस्त होणे किंवा वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीमुळे घाटवाटेतील वाहतूक ठप्प होते. तसेच पुण्याकडे येण्यासाठी जो बोगदा तयार केला आहे. त्यातून येण्यासाठी साधारण १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र हा मार्ग सुरू करण्यात आला त्यावेळी यावरून प्रतिदिन 20 हजार असणारीं वाहनांची संख्या आता ५५ हजारांवर पोहचली आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने देखील कोंडी आणि अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते. या साऱ्यांचा विचार करतच या नव्या बोगदा प्रकल्पाचे काम हाती घेतलेले आहे.

 

खंबाटकीच्या नवीन बोगदयासाठी वेळे गावापासून (ता. वाई) वाण्याचीवाडी ते खंडाळा दरम्यान ६.३ किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता होत आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगदयांचे नियोजन आहे. दोन्ही बोगदयाचे ११४८ मीटरपर्यंतचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. १६ .१६ मीटर रुंद व सुमारे ९ .३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगदयांमध्ये प्रत्येकी तीन मार्गीकेचे रस्ते तयार होत असून येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगदयातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे. बोगदा रस्त्यावर आपत्तकालीन रस्ताही बनवला जात आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 31 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket