Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » प्रवास करा आणि आनंदी रहा -प्रवीण कारखानीस

प्रवास करा आणि आनंदी रहा  -प्रवीण कारखानीस

प्रवास करा आणि आनंदी रहा  -प्रवीण कारखानीस

     प्रवास करा, अनोळखी भूप्रदेश पहा, अनोळखी लोकांशी संपर्क करा, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करा असे उद्गार कायम फिरत राहणाऱ्या या निवृत्त बँकरने मेळाव्यात काढले. आम्ही पुस्तक प्रेमी आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी संयुक्तपणे आयोजित कार्यक्रमात प्रवीण कारखानीस श्रोत्यांशी संवाद साधत होते.

 कारखानीस यांनी 1977 मध्ये मोटरसायकल वरून व अन्य सात साथीदारांना सोबत घेऊन मुंबई ते रोम रोम ते मुंबई असा साडेबावीस हजार किलोमीटरचा साहसी आणि प्रदीर्घ प्रवास केला. त्याचे अनुभव त्यांनी विशद केले. त्यामुळे श्रोते भारावून गेले. प्रारंभी आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ. संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी केलेल्या साहसी प्रवासाची ही माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. अध्यक्षीय समारोपात शिरीष चिटणीस यांनी कारखानीस यांच्या लेखन प्रवासाची माहिती दिली. अशा माणसांच्या संपर्कात आल्याने प्रवासाची आवड निर्माण होते असे ते म्हणाले.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीराम नानल यांनी करताना कारखानिस व त्यांचे सहकारी श्री मथुरे व देसाई यांना धन्यवाद दिले. सातारा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून येथेही प्रवास करावा अशी विनंती नानल यांनी केली.या कार्यक्रमास राजकुमार निकम, वि.ना.लांडगे, विनायक भोसले व अन्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 54 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket