Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. त्यांच्या कल्पक संकल्पनेतून जवळपास पाच ते सहा वर्षांच्या खंडानंतर स्नेहसंमेलन पुन्हा आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाने शाळेचा वारसा पुन्हा उजळून निघाला आहे.

स्नेहसंमेलनाचे पाच दिवस क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक एकतेचा उत्सव ठरणार आहेत. दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रस्सीखेच, कबड्डी, क्रिकेट, १०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक अशा मैदानी स्पर्धांसोबत रुबिक क्यूब, बुद्धिबळ, कॅरम व लुडो यांसारख्या अंतर्गत खेळांच्या स्पर्धांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष शाहीन पन्हाळकर मॅडम, क्रीडा प्रमुख संदीप कदम सर आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख अभिषेक साळुंखे सर असून, पारितोषिक वितरण विभाग प्रमुख कानडे सर व औघडे सर असून स्नेहभोजनाच्या जबाबदारीचे नेतृत्व बगाडे मॅडम यांनी केले आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन सर्व शिक्षकांनी परिपूर्णपणे सांभाळले आहे.

शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. पी. आर. माने सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “स्नेहसंमेलन हा केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना व आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा सोहळा आहे,” असे ते म्हणाले.

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाला विशेष पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी उस्फूर्तपणे विविध बक्षिसे जाहीर करून विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घातली. यामुळे स्नेहसंमेलनाचे स्वरूप अधिक रंगतदार झाले आहे.

स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम २६ डिसेंबर रोजी होणार असून २७ डिसेंबर रोजी स्नेहभोजन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये संपूर्ण जोशाने सहभाग नोंदवला आहे. शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे स्नेहसंमेलनाचा सोहळा संस्मरणीय ठरला आहे.या स्नेहसंमेलनाने विद्यार्थी, शिक्षक व समाजामध्ये स्नेहभावना निर्माण करून शाळेच्या वारशाला नवा आयाम दिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून राबवला गेला एकात्मिक घनकचरा प्रकल्प

Post Views: 19 मौजे अतिट येथे एसीजी केअर्स फाउंडेशन आणि इनोरा नो हाऊ फाउंडेशन व अतिट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानातून

Live Cricket