Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घ्यावे – श्रीरंग काटेकर

शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घ्यावे – श्रीरंग काटेकर

शैक्षणिक ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षण घ्यावे – श्रीरंग काटेकर

पी व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे , 400 विद्यार्थ्यांचा सहभाग

लिंब – बलशाली व सामर्थ्यशाली राष्ट्र निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता.जि.सातारा येथे गौरीशंकरच्या डॉ. पी व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सैनिकी व कमांडो प्रशिक्षण शिबिर अंतर्गत कार्यक्रमात बोलत होते .

यावेळी प्रभारी प्राचार्य घनशाम चव्हाण, नितीन शिवथरे ,शितल शिंदे, सैनिक प्रशिक्षणाचे ट्रेनर रोहित कांबळे, ऋषिकेश निकम, विशाखा देशमुख अदि प्रमुख उपस्थित होते .

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण करणे बरोबरच राष्ट्र अभिमानाची भावना वाढीला लावण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण पूरक ठरणार आहे .

प्रभारी प्राचार्य घनशाम चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने सैनिक प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना स्कूलच्या माध्यमातून दिला जात आहे विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

सैनिक प्रशिक्षणास विद्यार्थ्यांना बेसिक मिल्ट्री प्रशिक्षण धनुर्विद्या ,रोप मल्लखांब, पोल मल्लखांब, योगा, लाठीकाठी, दानपट्टा, तलवारबाजी, रायफल शूटिंग इत्यादी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे पहिली ते दहावी पर्यंतचे चारशे विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे या विद्यार्थ्यांना दुर्गेश घोरपडे, ऋषिकेश निकम, अजय घोरपडे, श्रेया भोसले, वैष्णवी मोरे ,रोहित कांबळे यांची मार्गदर्शन लाभत आहे .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नितीन शिवथरे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 24 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket