शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » ठळक बातम्या » कर्जाची माहिती न दिल्याने बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; कराडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

कर्जाची माहिती न दिल्याने बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; कराडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

कर्जाची माहिती न दिल्याने बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; कराडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

सातारा :कराडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शेळी पालनाच्या कर्जाची माहिती न दिल्यामुळे थेट जीवघेणार हल्ला करण्यात आला आहे. बॅंक मॅनेजरवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने मानेच्या दिशेने केलेला कोयत्याचा वार बँक मॅनेजरने हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या हल्ल्यात बँक मॅनेजरच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आशिष कश्यप (वय ४४) हल्ली रा. बनपुरी कॉलनी कराड, मूळ रा. बाकीपूर पटना, बिहार असे जखमी बँक मॅनेजरचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून आशितोष दिलीप सातपुते याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेत बँक मॅनेजर आशिष कश्यप हे जुलै २०२४ पासून बँक मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

कश्यप यांनी स्वतःला जुन्या रेकॉर्ड असलेल्या खोलीत कोंडून घेतल्याने आशितोष याच्या हल्ल्यातून ते बचावले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर जखमी कश्यप यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket