Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बोरगाव येथील दुर्गादेवीच्या आरतीला इस्राईलचे पाहुणे

बोरगाव येथील दुर्गादेवीच्या आरतीला इस्राईलचे पाहुणे

बोरगाव येथील दुर्गादेवीच्या आरतीला इस्राईलचे पाहुणे

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )बोरगाव ता. सातारा येथील रामेश्वर चौकातील नवरात्र दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या आरतीचा मान मिळाल्याने इस्राईल येथून आलेले पाहुणे वल्लदिस्लाव आँफ्रांको, केरेन सेदार, नीर नुरियल व यासी अब्राहम मिलमान यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. देवीच्या आरतीत तल्लीन होतंच सर्वांनी दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.

कृषिप्रधान भारतातील शेती पिकांचा अभ्यास करण्यासाठी इस्राईलचे एक पथक सातारा तालुक्यात आले आहे. याच पथकातील वल्लदिस्लाव आँफ्रांको, केरेन सेदार, नीर नुरियल व यासी अब्राहम मिलमान यांना जानकी ऍग्रोचे मालक शहाजी साळुंखे व शेखर साळुंखे यांनी देवीच्या आरतीला आमंत्रित केले होते.बोरगावची मानाची पहिली आई भवानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 

रामेश्वर चौकातील नवरात्र दुर्गादेवी उत्सव मंडळाची स्थापना १९९६ साली झाली आहे. पर्यावरण पूरक उत्सवाची संकल्पना.. चला पर्यावरण पूरक उत्सव साजरे करुया.. अशा सामाजिक जाणीव ठेवीत दुर्गादेवी उत्सव काळात मंडळातर्फे वृक्षारोपण आरोग्य शिबिर,भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात.

मंडळाचे अध्यक्ष राहुल लोखंडे उपाध्यक्ष युवराज बनकर यांनी परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार दत्तात्रय सुतार, सागर साळुंखे, शेखर साळुंखे, प्रज्योत साळुंखे, राहुल साळुंखे, निलेश जगताप, शंकर काटवटे सुहास सुतार, धीरज साळुंखे,अभिजित घाडगे, व मंडळाचे सर्व सभासद, प्रमुख कार्यकर्ते आणि महिलांवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर्शन कला केंद्र बोरगाव येथील पर्यावरण प्रेमी मूर्तिकार मारुती कुंभार यांच्या हातून देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती साकारली आहे. सदरची मूर्ती माती माध्यम मध्ये असून पर्यावरण पूरक आहे मूर्तीची उंची ९ फूट ९ इंच असून, मूर्तीचे वजन फक्त ६० किलो आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 73 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket