Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित शुभांगी दळवी लिखित “द लेस्बिअन” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित शुभांगी दळवी लिखित “द लेस्बिअन” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित शुभांगी दळवी लिखित “द लेस्बिअन” पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

सातारा  (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित जिद्द आणि चिकाटीने मार्गक्रमण करीत इतरांसाठी लढणाऱ्या स्त्रीगाथा-आनंदी आणि प्रियदर्शनी या पुस्तकानंतर संघर्ष आणि आत्मसन्मान यांचा आलेख मांडणाऱ्या समलिंगी महिलांचे भावविश्व शब्दबद्ध केलेल्या शुभांगी दळवी या लेखिकेच्या “द लेस्बिअन ” या त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दीपलक्ष्मी संस्कृती हॉल 759 अ शनिवार पेठ,सातारा.येथे रविवार दिनांक 06 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.

    सदर पुस्तकाचे प्रकाशन किशोर बेडकिहाळ, शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी, श्रीकांत कात्रे, सुचित्रा घोगरे- काटकर, डॉ.संदीप श्रोत्री या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर करणार आहेत.तरी सातारा आणि सभोवतालच्या परिसरातील सर्व लेखक,वाचक, तसेच रसिक श्रोत्यांनी प्रकाशन समारंभास उपस्थित रहावे. असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 63 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket