Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » साताऱ्यात रविवारी भारतीय संविधानाविषयी अधिवेशन अभिनेते किरण माने यांच्या हस्ते उद्घाटन

साताऱ्यात रविवारी भारतीय संविधानाविषयी अधिवेशन अभिनेते किरण माने यांच्या हस्ते उद्घाटन

साताऱ्यात रविवारी भारतीय संविधानाविषयी अधिवेशन अभिनेते किरण माने यांच्या हस्ते उद्घाटन

        प्रतिनिधी : भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियान’ अर्थात ‘बी एस फोर राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत’ अजिंक्य पतसंस्थेच्या विध्याभवन येथे रविवारी जिल्हा क्लस्टर अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचे हस्ते होणार असून प्राथमिक व माध्यमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , प्रभावती कोळेकर, जिल्हाअधिक्षक कृषिअधिकारी भाग्यश्री प्रमोद फरांदे , उपशिक्षणाधीकारी रवींद्र खंदारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

            गेली सहा वर्षे देशात बी एस फोर अभियान सुरू असून यावर्षी देशातील शेकडो जिल्ह्यात क्लस्टर अधिवेशने सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून ही अधिवेशन होत असून यावेळी अंनिस, संभाजी ब्रिगेड, ओबीसी संघटना, शिक्षक संघ, समिति , प्राचार्य संघटना, बौद्ध महासभा, बीएसएनएल, कास्ट्राईब, ईबटा,इत्यादि सुमारे पंचवीस संविधानवादी सामाजिक संघटना सहभागी होत असून पूर्णतः सामाजिक कार्यक्रम आहे. 

       अधिवेशनामध्ये किरण माने , शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, भागयश्रि फरांदे , रविंद्र खंदारे , प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर,भरत लोकरे, संतोष शिंदे, प्राचार्य राजेंद्र भिंगारदेवे, प्रकाश खटावकर , एम बी भोकरे, संजय करपे, इत्यादि विचार मांडणार असून संविधानाचे अभ्यासक डॉ विनोद पवार ही पहिल्या सत्राची व एम डी चंदनशिवे ही दुसऱ्या सत्राची अध्यक्षता करणार आहेत.  

       ध्वजारोहणाने सुरू होणाऱ्या व दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात भारतीय संविधान जागृती, अंमलबजावणी,सुरक्षा, संवर्धन,सामाजिक अभिसरण इत्यादि विषयावर चर्चा ,संवाद होणार आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्वानी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्लस्टर समन्वयक सुशांत गायकवाड, हणमंत सकलावे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket