Home » राज्य » शिक्षण » तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत हजारमाची येथील माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत हजारमाची येथील माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक 

तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत हजारमाची येथील माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक 

तांबवे –सदाशिवगड(हजारमाची) ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक शाळेतील १४ ते १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.या संघाची जिल्हा स्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे.

 सैदापूर ता कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षातील पावसाळी शासकीय क्रिडा विभागातील हाॅलीबाॅल स्पर्धा पार पडल्या यामध्ये कराड विठामाता विद्यालयाच्या हाॅलीबाॅल संघाचा पराभव करुन माध्यमिक विद्यालय हजारमाची च्या हाॅलीबाॅल मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.या यशस्वी संघास क्रिडा प्रशिक्षक अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.गेली सलग पाच वर्षांपासून या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत आहेत.

या यशस्वी संघाच संस्थेचे सचिव डी .ए .पाटील, अध्यक्ष एम.व्ही.चव्हाण,संचालक राजेंद्र काटवटे मुख्याध्यापिका मनिषा पानवळ यांनी विजेत्या संघातील विद्यार्थीनीं तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 17 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket