Home » राज्य » शिक्षण » हजारमाचीत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

हजारमाचीत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 

हजारमाचीत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप 

कराड – सदाशिवगड ता कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना उद्योजक जीवन सावंत यांच्या वतीने गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डी ए पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पानवळ यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.

जीवन पाटील यांनी या विद्यालयातील विद्यार्थिनी अतिशय संस्कारी, अभ्यासू आहेत; परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेण्यामध्ये अंडचणी येत आहे अशा विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सहकार्य केले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका मनिषा पानवळ, शिक्षक अंजली पाटील, संजय गोसावी, राजू अपिने, सुरेश वेताळ, तानाजी राजमाने, शशिकला पोळ,सुवर्णा शेळके, अनिल जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा

Post Views: 419 यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा मानसिक आरोग्य व आत्मशांतीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम

Live Cricket