Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.  

रविवार दि. १८ रोजी दु.१२:१५ वा. सैनिक स्कुल मैदान सातारा येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.  

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या “सुरुची” जनसंपर्क कार्यालयात या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज दुपारी पार पडली. या बैठकीला सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, याबाबत आपापल्या भागात जनजागृती करावी, असे आवाहन करीतच रविवारी होणा-या मेळाव्याला प्रत्येक गावातून जास्तीत जास्त महिला उपस्थित राहाव्यात याचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थितांना केल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 83 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket