Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » तेजल उदयसिंह भोसले यांची MPSC मार्फत PSI पदी निवड

तेजल उदयसिंह भोसले यांची MPSC मार्फत PSI पदी निवड

PSI पदाच्या निवडीने भुईंजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या भुईंज येथील कु. तेजल उदयसिंह भोसले हिचा श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भुईंज दि.वाई तालुक्यातील चाहूर (भुईंज ) येथील कु. तेजल उदयसिंह भोसले हिची नुकतीच MPSC मार्फत PSI पदी निवड झाली.

किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज येथे कार्यरत असणारे डिस्टीलरी मॅनेजर श्री उदयसिंह भोसले साहेब यांची ती कन्या असून तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण भुईंज येथे झाले.अभियांत्रिकी शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षा मार्ग निवडला आणि ती त्यात यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली.

कु. तेजल भोसले हिच्या यशाबद्दल तिचा भुईंज येथील महालक्ष्मी मंदिरात देवस्थान कमिटी व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान कमिटीचे सचिव चंद्रकांत केसरकर यांनी केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन मदन भोसले, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, देवस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब जाधवराव, राजेंद्र केंडे, राजेंद्र भोसले, महेंद्र जाधवराव, विजय भोसले, ग्रमपंचायत सदस्य दाभाडे, सुरेशभाऊ भोसले, उदयसिंह भोसले, दीपक धनावडे, कुणाल तांबोळी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या गंगा गाडे, संजीवनी दळवी,विद्या किर्वे, रोहिणी साळूंखे, सौ.भुजबळ आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 86 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket