Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विश्वासराव पवार यांचा उत्तम सेवक पुरस्काराने सन्मानित

विश्वासराव पवार यांचा उत्तम सेवक पुरस्काराने सन्मानित

विश्वासराव पवार यांचा उत्तम सेवक पुरस्काराने सन्मानित

शेणोली /प्रतिनिधी:सौ.वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चेरीटेबल ट्रस्ट ,शिवाजी स्टेडियम कराड येथील झालेल्या कार्यक्रमामध्ये कै. प्रभाकर वासुदेव परांजपे ( कै. नानासाहेब देशपांडे यांचे सेवक)यांचे स्मरणार्थ देशपांडे कुटुंबियांच्या सौजन्याने उत्तम सेवक पुरस्कार शिक्षण संस्था मंडळ नियुक्त सेवक म्हणून काम करणारे कार्वे,गोपाळनगर येथील विश्र्वास बाबू पवार यांना उत्तम सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिवर्षा प्रमाणे शिक्षण मंडळ ,कराड यांच्यातर्फे गुरू गौरव गुरू पौर्णिमा समारंभ संपन्न झाला .यावेळी कराड तालुक्यातील कार्वे, गोपाळनगर येथील विश्र्वास बाबू पवार यांनी शिक्षण संस्थेमध्ये सेवक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांना उत्तम सेवक पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार मा. डॉ. अविनाश पंत , माजी व्हॉईस चेअरमन ,A.I.C.T.E.नवी दिल्ली

यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे, अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार ,राजेंद्र लाटकर जॉईन सेक्रेटरी ,श्रीमती . अनधा परांडकर व्हा.चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 12 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket