Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर डी फार्मसी लिंबचे विद्यार्थी गुणवत्तेत चमकले.. महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९८.३६ टक्के तर व्दितीय वर्षाचा निकाल 85 टक्के

गौरीशंकर डी फार्मसी लिंबचे विद्यार्थी गुणवत्तेत चमकले.. महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९८.३६ टक्के तर व्दितीय वर्षाचा निकाल 85 टक्के

गौरीशंकर डी फार्मसी लिंबचे विद्यार्थी गुणवत्तेत चमकले.. महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९८.३६ टक्के तर व्दितीय वर्षाचा निकाल 85 टक्के..

 लिंब – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई( एम एस बी टी ई ) यांनी उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत गौरीशंकर डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

 यामध्ये महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ९८.३६% तर द्वितीय वर्षाचा निकाल 85 % लागला. प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये महाविद्यालय स्तरावर प्रथम क्रमांक आकांक्षा रेणुशे 82.30% द्वितीय क्रमांक सुहानी माने 80.90% तृतीय क्रमांक रूपाली नरबत 79 % यांनी प्राप्त केला तर द्वितीय वर्षातील यशश्री कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक 87.55% द्वितीय क्रमांक अश्विनी बुणगे 84.46% तृतीय क्रमांक शिवांजली मांढरे 83.36% गुण प्राप्त करून महाविद्यालयाची निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली.

 विद्यार्थ्यांना प्राचार्य विजय राजे,प्रा. सविता मोरे ,प्रा. सारिका लोखंडे, प्रा. स्वाती पवार, प्रा. उज्वला बाल्टे, प्रा. पूनम पाटील, प्रा, शिवानी पोळ, प्रा. रणजित थवरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप , उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर , जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 15 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket