माणस वाचविण्या साठी शहाबाग ग्रामपंचायतीचा डॉल्बी बंदीचा ठराव कौतुकास्पद
वाई प्रतिनिधी :वाई शहरानजिक असलेल्या शहाबाग ग्रामपंचायतिने ग्रामसभेत डॉल्बी बंदीचा ठराव केला असून यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील मंगल कार्यालयातील लग्नकार्य डॉल्बीविना होणार आहेत. डॉल्बीच्या आवाजाने आजपर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनसह नागरिकांनी कौतुक करुन शहाभाग ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे
सार्वजनीक मिरवणुकीनसह लग्नकार्यात आजकाल डॉल्बी ही एक फॅशन झाली आहे. यासाठी कित्येक हजार रुपयांचा नाहक खर्च केला जातो.तरुणपीढी पारंपरिक वाद्यांना फाटा देत सर्वत्र डॉल्बीला पसंती देतात हे दुर्दैव्य आहे . यासाठी न्यायालयाने आणी प्रशासनाने आवाजाची मर्यादा घालून दिली असली तरी सर्व नियम धाब्यावर बसवून तरुणपीढी डॉल्बी कर्णक्रकश आवाजात वाजवत असतात. यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या आवाजा मुळे अनेक नागरिकांना देशासह राज्यात जिल्ह्यात आणी वाई तालुक्यात आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे. एक महिन्या पूर्वीच वाईतील हेमंत करंजे या युवकांचा डॉल्बीमूळे मृत्यू झाला होता. अशा अनेक आठवणी आजही ताज्या आहेत .ज्यांचे मृत्यू डॉल्बी मुळे झाले त्यांचे प्रपंच आज ऊघड्या वर आले आहेत . आणी कुटुंबिय निराधार सारखे बेसहारा जिवन जगताना दिसत आहेत .
याचा सर्वाधिक त्रास वाई शहरातील वयोवृद्ध व लहान बालके तसेच आजारी रुग्णांना होताना दिसत आहे .डॉल्बीच्या कर्कश्श आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडल्याने वाईतील समस्त नागरिक त्रस्त झालेले आहेत. अनेकांना डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो व याबद्दल अनेकजण पोलिसांन कडे तक्रारी करत असतात. पण या तक्रारीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलिस प्रशासन देखील हतबल झाले आहे . वाई शहराला लागूनच असलेल्या शहाबाग ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांचे जीव वाचले पाहीजेत हे ऊदीष्ठ डोळ्यासमोर ठेवुन डॉल्बी बंदीचा ठराव केला.हि बाब कौतुकास्पद आहे . या ग्रामपंचायत हद्दीत अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यांना ही या ठरवाच्या प्रति देण्यात आल्या आहेत. यामुळे येथील लग्नकार्य आता डॉल्बीविना होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे वाई तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून सर्व ग्रामपंचायतीनी असे ठराव करून डॉल्बी बंदी करावी असे आवाहनही शहाभाग ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी आणी गाव कारभार्यांनी एकत्रीत येवुन केले आहे .व सामाजिक राजकीय सहकार शैक्षणीक संघटनांनी एकत्रीत येवुन आपली माणसं वाचविण्या साठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन या ग्रामपंचायतीने केले आहे .
यावेळी ग्रामसभेत झालेल्या या धाडसी ठरवावर मतदान झाले. ६ विरुद्ध ३६ मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. तर १९ जन तटस्थ राहिले.
यावेळी सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच किरणकुमार जमदाडे, सदस्य माया जमदाडे पूनम गाढवे, विनय कोरडे, जयश्री दाभोळे, रेखा राजपुरे अजिंक्य जमदाडे सुधीर जमदाडे सुजाता जमदाडे ग्रामसेवक के एस चव्हाण, यांच्यासह जेष्ठ नेते वामनराव जमदाडे लालसिंग जमदाडे महेंद्र जमदाडे संजय जमदाडे विठ्ठल जमदाडे प्रभाकर जमदाडे दीपक कोरडे, वसंत राजपुरे बापू राजपुरे अनिल जमदाडे संजय शिंदे नारायण रासकर सतीश जमदाडे अजित जमदाडे प्रताप लोळे,घनश्याम लोळे आदी उपस्थित होते.
