Home » ठळक बातम्या » यात्रेनिमित्त 101 कवितांची बोर्ड रूपात काव्य जत्रा

यात्रेनिमित्त 101 कवितांची बोर्ड रूपात काव्य जत्रा

यात्रेनिमित्त 101 कवितांची बोर्ड रूपात काव्य जत्रा

वाई तालुक्यात यात्रा कमिटीचा नवीन उपक्रम

वाई प्रतिनिधी :अमृतवाडी तालुका वाई येथील वयोवृद्ध कवी शशिकांत केशव पार्टे वय 77 यांनी पद्मावतीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सगे सोयरे पै पाहुणे मित्र मंडळी सासूरवासिनी ग्रामस्थ यांना वाचाल तर वाचाल शिक्षण करीन रक्षण या शैक्षणिक तत्त्वावर खास 101 कवितांची बोर्ड रूपात काव्य जत्रा भरवली असून यात्रेत अशा वेगळ्या उपक्रमांची कल्पना कौतुकास्पद असण्याचे मत प्रसिद्ध कवी लेखक सुरेश शिंगटे यांनी व्यक्त केले

अमृतवाडी येथील 101 काव्य जत्रा भरवली असून त्याचे उद्घाटन प्रसिद्ध कवी सुरेश शिंगटे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच सचिन रत्न पारखे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील निकम कवि लेखक सुरेश शिंगटे ज्येष्ठ नागरिक महादेव पाटील भरत निकम सयाजी यादव नवलाई पतसंस्थेचे माजी चेअरमन मनोहर निकम उद्योजक दत्ताशेठ बांदल अँड अक्षय भाडळकर सर्व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन 

Post Views: 27 धन्वंतरी पतसंस्थेच्या यशाचे मर्म धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३६ वा वर्धापनदिन  आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा

Live Cricket