Home » Uncategorized » नाराज नाही, मोदीं साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी काम करणार – पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा

नाराज नाही, मोदीं साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी काम करणार – पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा

देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीसाहेब यांचा नारा आहे ४०० पार त्याला साथ देण्यासाठी माझं कर्तव्य आहे ते काम मी करणार आहे असे सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले. सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लोकसभेची जागा शिवसेनेनें लढावी असा आग्रह होता. 15/ 4 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी झालेल्या चर्चेत सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळी स्थित्यंतरे झाली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुरुषोत्तम जाधव यांना मोठी संधी मिळणार आहे. असे देवेंद्रजी फडणवीस म्हणाले.

आगामी काळात सर्व बाजूंनी विचार करून महायुती मजबूत करण्यास भर देणार असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आपण सर्वसामान्य शेतकरी वारकरी कुटुंबातील असून जीवाभावाचे सहकारी,कार्यकर्ते यांचे आभार मानले.

शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना काहीतरी मिळते म्हणून मी काम करत नाही सातारा जिल्ह्याचा विकास हेच उद्दिष्ट असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्याला महायुतीच्या उमेदवारांचं काम करायचं आहे.

 पुरुषोत्तम जाधव( शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा )

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान

Post Views: 91 महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान सातारा -(अली मुजावर) सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर आणि

Live Cricket