Home » खेळा » राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारच्या रुद्रनिल पवार याची निवड

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारच्या रुद्रनिल पवार याची निवड

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारच्या रुद्रनिल पवार याची निवड

सातारा -प्रतिनिधी दि.१८ ते २४ मार्च रोजी नोएडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ३ऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात सातारच्या रुद्रनिल निलेश पवार याची निवड झाली आहे.

निगडी (सातारा) येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांचा मुलगा आणि साताऱ्यातील युनिव्हर्सल स्कूलचा विद्यार्थी रुद्रनिल पवार हा सातत्याने विविध बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो.दि.८ ते १० मार्च दरम्यान अकोला येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.यातून पुढील आठवड्यात नोएडा येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. प्रशिक्षक सागर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तो सध्या सराव करत आहे.

या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा,हरिश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रविंद्र होले,अमर मोकाशी, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर,तेजस यादव, श्रावणी बर्गे यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket