अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

नीट, सेट आणि जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची गरज लागते. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन प्रस्ताव संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत समिती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या प्रवर्गाच्या अर्जदारांनी https://etribevalidity.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने समितीच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत विहित केलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कपिल टॉवर्स, सी विंग, पाचवा मजला,पुणे आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१. संपर्क क्रमांक: ०२०-२६०५९६६१ वर संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket