Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या ‘ASDD’ मतदारांना अंतिम यादीत नाव नोंदणीची संधी

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या ‘ASDD’ मतदारांना अंतिम यादीत नाव नोंदणीची संधी

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या ‘ASDD’ मतदारांना अंतिम यादीत नाव नोंदणीची संधी

सातारा, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने या कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट होऊ न शकलेल्या गैरहजर, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) वर्गवारीतील मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या दावे व हरकतींवर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जातील आणि ३० नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुनरिक्षणापूर्वीच्या मतदार यादीत नाव असूनही ३१ ऑगस्ट २०२६ च्या प्रारूप यादीत नावे नसलेल्या गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुबार किंवा इतर (ASDDO) मतदारांच्या याद्या कारणांसह जिल्हा प्रशासनाच्या https://www.satara.gov.in/notice/sir-2026-asddabsent-permanantly-shifted-dead-duplicate-list/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय या याद्या सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडेही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

गणना प्रपत्र निर्गमित करूनही ASDD यादीत नाव गेल्यामुळे ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, अशा सर्व मतदारांनी अंतिम यादीत नाव नोंदवण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार महाराष्ट्र दालनाचे १४ला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन नवी

Live Cricket