मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावा; अपघात टाळण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची जनजागृती मोहीम रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
Home » राज्य » शिक्षण » जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत दिवाळी सणाचे औचित्य साधून आकाश कंदील बनवणे, कागदी फुले तयार करणे, दिवाळी भेटकार्ड बनवणे आदी विविध कलात्मक उपक्रमांची कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कलाकौशल्य विकसित व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचा आनंद मिळावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, विविध सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक आकाश कंदील, सुंदर कागदी फुले आणि मनमोहक दिवाळी भेटकार्ड तयार केली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वतःच्या हातांनी विविध वस्तू तयार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलानिर्मितीचा आनंद मिळण्याबरोबरच स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, कल्पकता, सहकार्य आणि उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करण्याचे महत्त्वही समजले.

या कार्यशाळेस मुख्याध्यापिका छाया शिंदे, उपशिक्षक किरण यादव, दत्ता नाळे, अमोल घनवट आणि रेणुका कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती तयार करून आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला.

शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाचा, कलात्मक दृष्टिकोनाचा आणि सर्जनशीलतेचा विकास घडवून आणण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात. या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण दिवाळीच्या आनंदाने आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने भारावून गेले.कृतीतून शिक्षण, कलात्मकतेतून सर्जनशीलता आणि कौशल्यातून स्वावलंबन’ हा संदेश देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड

Live Cricket