सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ऊसतोड हंगामात सतर्क राहा; मानव-वन्यजीव संघर्ष टाळा महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दारूसाठी पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी पतीला जन्मठेप; उंब्रज पोलिसांच्या भक्कम तपासाला मोठे यश तेलंगणाच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करताना महाराष्ट्राच्या हिताच्या रक्षणाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारणाची अकरा प्रकारची कामे हाती घेण्याचा निर्णय

मुंबई: राज्यातील खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) आणि ट्रिगर-२ (दुसरी कळ) लागू झालेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. या तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची विविध कामेही हाती घेण्यात येणार आहेत. अपुरा पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

विभागाच्या योजनांतील प्रगतिपथावरील आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासह जलसंधारण संरचनांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व बंधाऱ्यांवर गेट किंवा फळ्या बसवून पाणी अडविणे, नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून नीडल बसविणे, जलसाठ्यांतील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, वनराई बंधारे उभारणे तसेच बंधारे, तलाव आणि नाला खोलीकरणाच्या ठिकाणी रिचार्ज शाफ्ट तयार करण्यात येणार आहेत. शासकीय व खासगी इमारतींवर पर्जन्यजल संचयन संरचना उभारण्याचाही यात समावेश आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.या कामांसाठी जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.०, जिल्हा नियोजन निधी, विविध घटक व उपयोजना, खनिज विकास निधी, खासदार व आमदार निधी, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी, रोजगार हमी योजना आणि अन्य उपलब्ध शासकीय निधीचा वापर करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना किंवा व्हीबी जी राम जी योजनेच्या निधीतून जास्तीत जास्त कामे हाती घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

दुरुस्तीची कामे निवडताना जलदर्पण ॲपवरील अद्ययावत माहितीची पडताळणी केली जाणार आहे. प्रचलित आर्थिक मापदंडाच्या २० टक्के मर्यादेतील आणि २५ लाख रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या दुरुस्ती कामांना मंजुरी देण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राहतील. सर्व कामांचे जिओ-टॅगिंग करून संबंधित योजनांच्या पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांमार्फत कामांचा गोषवारा दर १५ दिवसांनी शासनाला सादर करावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल

Live Cricket