पाचगणीत ‘काव्यगंध पर्व सहावे’ उत्साहात; नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीत काव्यसोहळा रंगला!
सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांच्या कवितांनाही रसिकांची उत्स्फूर्त दाद
पाचगणी : रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी येथील सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यगंध पर्व सहावे’ हा काव्यसोहळा उत्साहात पार पडला. प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.यावेळी प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कविता सादर करून त्यांच्यात नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि स्फूर्ती निर्माण केली.
सातारा जिल्ह्यातील नामांकित कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली, तर सर आईन्स्टाईन अकॅडमी, ज्ञानगंगा हायस्कूल पांचगणीच्या विद्यार्थ्यांनीही कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांची शाबासकी आणि वाहवा मिळवली.
विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, मराठी भाषेची गोडी वाढावी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि जीवनातील विविध पैलू कवितांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांना नामांकित कवींचा सहवास आणि काव्यसादरीकरणाचा अनुभव मिळाल्याने हा उपक्रम विशेष ठरला.
या कार्यक्रमाला नितीन भिलारे, प्रमोद पवार, दीपक चिकणे, गोविंद कासुर्डे, महेश वाघमारे, अजय कांबळे, अनिल वन्ने, साहेबराव गोळे, विकास जाधव, अप्पा जाधव, आबा भिलारे, पत्रकार रविकांत बेलोशे, सचिन टक्के, अशोक चव्हाण, ॲड. गलांडे, सुयोग बाबर, प्रतीक्षा भोसले, सुनील लांडगे, विकास रुपणर, निहाल बागवान, किशोर कांबळे, सरोज कांबळे, रश्मी लोटेकर, अनिल रांजणे आणि समीर मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूलचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये साहित्यप्रेम रुजवणारा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.



