पाचगणीत १८ ऑक्टोबरला ‘काव्यगंध ’ काव्यसंमेलनाचे आयोजन; ख्यातनाम कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगणीत ‘काव्यगंध ’ रंगणार; मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पाचगणी : सर आइन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल, यांच्या वतीने ‘काव्यगंध ’ (पर्व सहावे) या काव्यसंमेलनाचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या साहित्यिक सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी व दंगलाकार श्री. नितीन चंदनशिवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि शैक्षणिक सल्लागार श्री. लक्ष्मीकांत रांजणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
काव्य, साहित्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या काव्यसंमेलनात साहित्यप्रेमींना काव्याचा आनंद अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम हॉटेल आयव्ही पार्क, भोसे,भिलार, पाचगणी येथे होणार असून साहित्यप्रेमींनी या काव्यसंमेलनाला उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.




