सहकारभूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा
सातारा : राज्यात अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकिक असणाऱ्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच वर्धापनदिनानिमित्त सामाजिक, क्रीडा, साहित्य इ. विविध क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सभासदांना धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा सायं. ४ वाजता धन्वंतरी भवन, ९३, शनिवार पेठ, सातारा या ठिकाणी होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी, महसूल मा. विक्रांत चव्हाण व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. अनिल बोधे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले राहणार आहेत. सदर दोन्ही कार्यक्रमास संस्थेच्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन मा. संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले व व्हा.चेअरमन डॉ. कांत फडतरे, सर्व संचालक मंडळ व सेवक वर्ग यांनी केले आहे.





