सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी
पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल चॅम्पियनशिप २०२६–२७ मध्ये हिंदुस्तान एफ.सी. संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, CBSE, पंचगणीच्या चार खेळाडूंनी संघासाठी महत्त्वपूर्ण आणि मोलाचे योगदान देत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
विद्यानिकेतनचे खेळाडू:
रुद्र बारगुडे – इयत्ता ७ वी
हर्षराज जगताप – इयत्ता ७ वी
रुद्र ढेबे – इयत्ता ७ वी
जनक मेहता – इयत्ता ८ वी
या चारही खेळाडूंनी हिंदुस्तान एफ.सी. संघाकडून खेळताना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. संघाच्या विजयासाठी त्यांनी उत्कृष्ट सांघिक भावना, मेहनत आणि जिद्द दाखवत मोलाची भूमिका बजावली.
उपांत्य फेरीत हिंदुस्तान एफ.सी.ने कराड शिवाजी एफ.सी.चा २–० असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.तर अंतिम सामन्यात Yash FC, Satara विरुद्ध रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये ५–४ असा रोमांचक विजय मिळवत हिंदुस्तान एफ.सी.ने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघाचा पारितोषिक वितरण समारंभ सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख श्री. अमृत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला.या संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंना संघाचे प्रशिक्षक श्री. मोनिल शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट सराव, शिस्त आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज CBSE, पंचगणीच्या व्यवस्थापनाने या चारही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. डायरेक्टर मा.भारती बिरामणे मॅडम, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विराज बिरामणे सर, प्राचार्य श्री. मनोज पिल्ले सर, ऑफिस कोऑर्डिनेटर श्री. राजन गाडेकर, ॲडमिन मेंबर श्री. सुशांत सर तसेच संपूर्ण विद्यानिकेतन CBSE परिवाराने खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले आहे.



