साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन
सातारा दि.9 : साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच ऐअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली.
या बैठकीला सैनिक स्कूलचे प्राचार्य टी.एस.रामनाथन, पोलीस अधीक्षक निखिली पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवस होणाऱ्या एअर शोमध्ये सुर्य किरण हे वायुदलाचे पथक सहभागी होणार आहे. तसेच एअरफोर्स ड्रील टीम व सिंफनी ऑकेस्ट्रा सहभागी असणार आहेत. यावेळी एअर शोचे उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.



