अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा
Home » Uncategorized » पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

सातारा : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोणतीही तक्रार, अडचण किंवा आक्षेप असल्यास नागरिकांनी जिल्हा निवडणूक शाखेच्या १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत मतदार, उमेदवार तसेच संबंधित घटकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी निवडणूक प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही बाब निदर्शनास आल्यास ती तातडीने निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त कायम राहण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा सूचना १९५० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदवाव्यात. तसेच तक्रारींची नोंद करताना संबंधित घटनेची आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या निवडणूक शाखेच्या संकेतस्थळावर पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील आवश्यक माहिती, मतदार याद्या आणि निवडणूकविषयक प्रसिद्धीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मोशी दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी

Live Cricket