सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » ठळक बातम्या » आरोग्य » नर्सिंग शिक्षणाला बळकटी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

नर्सिंग शिक्षणाला बळकटी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

नर्सिंग शिक्षणाला बळकटी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

२३ परिचर्या महाविद्यालयांच्या क्षमता वाढीसह १० नवीन महाविद्यालयांना मान्यता

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित परिचारिकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार वैद्यकिय शिक्षण विभागाने नर्सिंग शिक्षणाच्या सुविधा आणि प्रवेश क्षमता वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार ८ शासकीय जी.एन.एम. पदविका नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास, पाच कार्यरत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० करण्यास तसेच १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नर्सिंग शिक्षणाला बळकटी मिळणार आहे.

आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी रुग्णालये, औषधे आणि अत्याधुनिक उपकरणांसोबतच प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता महत्त्वाची आहे. राज्यात सध्या २,१७,६४० परिचारिका नोंदणीकृत असून, शासकीय तसेच खासगी आरोग्य संस्थांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेऊन नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानस आहे. मुंबईतील जी.टी. व सेंट जॉर्जेस रुग्णालय, तसेच धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर आणि सांगली येथील जी.एन.एम. पदविका नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या आठ महाविद्यालयांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत प्रत्येकी सात कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील कार्यरत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग (रायगड), रत्नागिरी, अमरावती, धाराशिव आणि गडचिरोली येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या तिन्ही बाबींसाठी एकूण ५५८.७१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केंद्र शासनाचा निधी वगळता ४९१.९१ कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, हा खर्च चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार जी.एन.एम. ते बी.एस्सी. नर्सिंग श्रेणीवर्धन, कार्यरत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी एका वर्षाकरिता सुमारे १२.५८ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने पदनिर्मिती करून संबंधित भरती नियमांनुसार रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

नर्सिंग शिक्षणाच्या या विस्तारामुळे राज्यातील विविध भागांमध्ये प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवाही अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थेला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket