एनआयपीएम (NIPM) सह्याद्री सातारा चॅप्टरच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी सातार्यात भव्य ‘पश्चिम विभागीय परिषद २०२६’चे आयोजन
सातारा प्रतिनिधी -यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात उद्योग क्षेत्रातील दिग्गज, कॉर्पोरेट लीडर्स आणि ७०० हून अधिक प्रतिनिधी ‘एचआर कॅलिडोस्कोप: शेपिंग ह्यूमन कॅपिटल जर्नी टुवर्ड्स भारत @ १००’ या विषयावर करणार सखोल विचारमंथन
मानव संसाधन (HR) आणि औद्योगिक संबंध (IR) क्षेत्रातील व्यावसायिकांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM) च्या सह्याद्री सातारा चॅप्टरच्या वतीने शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे एक दिवसीय भव्य पश्चिम विभागीय परिषदेचे (Western Regional Conference 2026) आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे असलेल्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात (ऑडिटोरियम) पार पडणार आहे.
या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
‘एचआर कॅलिडोस्कोप: शेपिंग ह्यूमन कॅपिटल जर्नी टुवर्ड्स भारत @ १००’ (HR Kaleidoscope: Shaping Human Capital Journey Towards Bharat @ 100)
भारत स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना व्यावसायिक नेतृत्व, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी प्रतिभा यांचा समन्वय साधणारा एक दूरगामी आराखडा तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या एक दिवसीय परिषदेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून उद्योगप्रमुख, एचआर व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवस्थापन शाखेतील अभ्यासक असे ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
उद्योग जगतातील नामवंत नेतृत्वाची प्रमुख उपस्थिती :
परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती व व्यवस्थापकीय संचालक मार्गदर्शन करणार असून यामध्ये प्रामुख्याने करारो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बालाजी गोपालन, मॅथर अँड प्लॅटचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. हेमंत वाटवे, तसेच एसीजी वर्ल्ड लिमिटेडचे ग्रुप सीईओ श्री. निखिल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
अभ्यासपूर्ण तांत्रिक सत्रे आणि मान्यवर वक्ते :
परिषदेत चार प्रमुख अभ्यासपूर्ण सत्रांच्या माध्यमातून पॅनल डिस्कशन्स, हाय-इम्पॅक्ट प्रेझेंटेशन्स आणि मुख्य व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर, नव्या युगातील जेन-झी (Gen Z) कर्मचाऱ्यांच्या आकांक्षा व कार्यसंस्कृती, ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी सक्षम एचआर नेतृत्व आणि नवीन लेबर कोड व इंडस्ट्रियल रिलेशन्स २.० (IR 2.0) यांसारख्या समकालीन आव्हानांवर मंथन होणार आहे.
या परिषदेच्या विविध सत्रांत डॉ. संतोष भावे (माजी संचालक – HR, भारत फोर्ज), मेजर जनरल अमर कृष्णा (इंडियन आर्मी वेटरन), श्री. अमित चौधरी (कॉर्पोरेट ग्लोबल हेड – HR, विप्रो), श्री. विक्रम मस्के (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व CHRO, रेनमेटल केएसपीजी), डॉ. लक्ष्मण भोसले (संचालक – HR, एल अँड एल प्रॉडक्ट्स इंडिया), श्रीमती अनू शेट्टी (संचालक – HR, एफपीव्ही इंडिया), श्रीमती प्राची सोनचल (संचालक – HR, फोसेको इंडिया), श्री. प्रशांत आंबोलगेकर (उपाध्यक्ष – HR, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन), डॉ. सुलक्षणा शेट्टी (CHRO, एसबी कॉन्स्टांशिया), डॉ. विश्राम देशपांडे (प्रकल्प संचालक, यशदा), श्री. रामहारी गुटे (हेड – ER, स्कोडा ऑटो), श्रीमती मोनाली रिंगे (उपाध्यक्ष – HR, रिटर इंडिया), श्री. गौतम भोसले (महाव्यवस्थापक – कॉर्पोरेट HR, फियाट इंडिया), श्रीमती प्राजक्ता जोशी (ग्रुप एचआर हेड – कॉर्पोरेट, थर्मॅक्स), डॉ. संग्रामसिंग पवार (संस्थापक व सीईओ, माइंडवर्क्स ग्लोबल टेक्नॉलॉजीज), डॉ. मानस देवान (संस्थापक, टॅलेंट फायंडर एक्स), डॉ. नरेंद्र पाटील (उपाध्यक्ष, NIPM वेस्टर्न रिजन), प्रा. शितलकुमार रावळंदाळे (डीन – प्लेसमेंट व अध्यक्ष, ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन), तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (MCCIA) श्री. मानगावे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सहभागासाठी जाहीर आवाहन :
उद्योग जगतातील बदल, धोरणे आणि व्यावसायिक नेटवर्किंगचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत मोलाचे ठरणार आहे.तरी पश्चिम महाराष्ट्रातील मानव संसाधन (HR) व्यावसायिक, प्लांट हेड्स, एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजर्स, उद्योजक तसेच व्यवस्थापन (MBA/MSW) विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक व कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) डॉ. नितीन देशपांडे तसेच NIPM सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष व विप्रो पारि (Wipro PARI) चे ग्लोबल आयआर हेड डॉ. उदय भोसले यांनी केले आहे.
समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे निमंत्रण :या एक दिवसीय परिषदेच्या समारोप समारंभासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फारूक नरीमन कूपर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारचे पालकमंत्री ना. श्री. शंभूराजजी देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामीण विकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे, मंत्री ना. श्री. मकरंद आबा पाटील, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर, कोरेगावचे आमदार आ. श्री. महेशजी शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क :
परिषदेच्या सविस्तर वेळापत्रकासाठी, अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी NIPM सह्याद्री सातारा चॅप्टरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
👉वेबसाईट: www.nipmsatara.in
आयोजक: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM) – सह्याद्री सातारा चॅप्टर
दिनांक: शनिवार, १० ऑक्टोबर २०२६
स्थळ: यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे, सातारा, महाराष्ट्र




