अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

सातारा – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अभय केंद्र व संरक्षण अधिकारी कार्यालय, तालुका महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर येथील गिरिस्थान नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ३ येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, बाल संरक्षण समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांना महिला व बाल संरक्षणाशी संबंधित विविध कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ आणि हुंडा प्रतिबंध कायदा (२० जून १९६१) या महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच बालकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बाल संरक्षण कायद्यांविषयी उपस्थितांना जागृत करण्यात आले.

तसेच, गरजू व अनाथ बालकांच्या संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’ची माहिती देऊन नागरिकांनी व पालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये महिला व बाल हक्कांच्या संरक्षणाबाबत मोलाची जनजागृती झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत सातारा दि.23: इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये

Live Cricket