Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नागरिकांच्या जीवनात परिवर्तनासाठी सेवा संकल्प अभियान प्रभावी ठरणार: प्राथमिक शिक्षक पांडुरंग कुलकर्णी

नागरिकांच्या जीवनात परिवर्तनासाठी सेवा संकल्प अभियान प्रभावी ठरणार: प्राथमिक शिक्षक पांडुरंग कुलकर्णी

नागरिकांच्या जीवनात परिवर्तनासाठी सेवा संकल्प अभियान प्रभावी ठरणार: प्राथमिक शिक्षक पांडुरंग कुलकर्णी

​सातारा –शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राबवण्यात येणारे सेवा संकल्प अभियान हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या अभियानामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक व मोठा बदल घडून येईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षक पांडुरंग कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

कोळे तालुका कराड येथील नवभारत तरुण मंडळामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी श्री कुलकर्णी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी हेमंत कुमार चव्हाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

​सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली आणि एकाच व्यासपीठावरून नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, महसूल, कृषी व समाजकल्याण विभागांच्या विविध योजनांचा समावेश असून, गरजूंपर्यंत थेट मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत केवळ शासकीय योजनांची माहिती व लाभ न देता, विविध सामाजिक उपक्रमही प्रत्यक्ष राबवले जाणार आहेत. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

​या उपक्रमाबाबत बोलताना प्राथमिक शिक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, सेवा संकल्प अभियान हे केवळ एक उपक्रम नसून ते सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाचे माध्यम आहे. विविध विभागांच्या समन्वयातून योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. या अभियानामध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket