मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावा; अपघात टाळण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची जनजागृती मोहीम रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या आर्थिक लाभात वाढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळशी येथे कार्यानुभव विषयांतर्गत कार्यशाळा उत्साहात संपन्न. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा, उत्तम संस्कार जोपासा!” — प्रा. वसंत हंकारे  यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘आई-बाप समजून घेताना’ प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन
Home » Uncategorized » भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी

भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी

भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी

पुणे- राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिओलॉजी सभागृह, पहिला मजला, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे सल्लामसलत आयोजित करण्यात आली आहे.

पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने, भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग या सल्लामसलतीत महत्त्वाचा ठरणार आहे. हा संवाद कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शनिवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील संबंधित घटकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, अनुभव आणि सूचनांवर चर्चा

भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व उमेदवारांचे अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा सूचना समिती जाणून घेणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण आणि परीक्षा अनुभव यांसह भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध विषयांवर सूचना मांडता येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात

मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड

Live Cricket