Home » Uncategorized » उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत मंगळवारीपासून आठ सलाईनद्वारे उपचार

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत मंगळवारीपासून आठ सलाईनद्वारे उपचार

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या निगराणीसाठी २४ तास वैद्यकीय पथक कार्यरत

मंगळवारीपासून आठ सलाईनद्वारे उपचार

जालना-(जिमाका) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे अन्न व पाण्याविना उपोषण करीत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत आहेत. काल श्री. जरांगे पाटील यांना सात सलाईन लावण्यात आल्या. आज दुपारीही त्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांना एक सलाईन लावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आऱोग्य यंत्रणेने दिली आहे.

वैद्यकीय पथकाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता त्यांची वैद्यकिय तपासणी केली. यावेळी त्यांची प्रकृती सर्वसाधारण मध्यम स्वरूपाची असल्याचे आढळले. त्यांना ८ सप्टेंबर रोजी सात बाटल्या आयव्ही फ्ल्यूड सलाईन देण्यात आले. तसेच आज दुपारीही श्री. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना १ सलाईन लावण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

उपोषणाचा बारावा दिवस असल्याने संभाव्य आरोग्यविषयक धोके श्री. जरांगे यांना समजावून सांगण्यात आले आहेत. तथापि, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिलेली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket