Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा गोविंदांसोबत आनंदोत्सव; मेढ्यात बाबाराजे महादहीहंडी सोहळा उत्साहात

छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा गोविंदांसोबत आनंदोत्सव; मेढ्यात बाबाराजे महादहीहंडी सोहळा उत्साहात

केळघर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नामदार छत्रपती बाबाराजे महादहीहंडी सोहळा मेढा येथे मोठ्या उत्साहात अभुतपूर्व गर्दीने साजरा झाला.

यावेळी फाउंड्री पिक्चर अभिनेत्री राजेश्वरी उर्फ शालू आणि रिलस्टार अभिनेत्री गाऊ खुडे यांचेही विशेष आकर्षण होते.यावेळी आदरणीय महाराजसाहेब यांनी सुद्धा गोविंदांमध्ये सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला मेढा नगरीत प्रथमच नामदार छत्रपती बाबाराजे महा दहीहंडी सोहळ्यासाठी विविध ठिकाणातून 12 दहीहंडी गोविंदा पथक सहभागी झाले होते यात विटा,शिरवळ, मेनवली, दक्षिण विभाग जावली, रिटकवली, आलेवाडी, मोहाट, इच्छापूर्ती गोविंदा पथक गांधीनगर, श्रीकृष्ण महिला गोविंदा पथक मेढा, श्रीकृष्ण बालगोविंद पथक मेढा, भैरवनाथ तालीम संघ गोविंद पथक मेढा,आगलावेलाडी गोविंदा पथक अशी पथकं सामिल झाली होती. या सर्वांनी मोठ्या उत्साहात पाच सहा, पाच सहा थर लावून सलामी दिली आणि मानाची दहीहंडी फोडण्यासाठी सर्व पथकांमधून चिट्ट्या टाकण्यात आल्या यावेळी बाबाराजे यांनी एक चिठ्ठी काढली त्याचा मान इच्छाशक्ती गोविंदा पथक गांधीनगर मेढा यांना मिळाला मानाची.दहीहंडी त्यांनी फोडली तर महिलांची मानाची दहीहंडी श्रीकृष्ण गोविंद पथक मेढा यांनी फोडली व स्टेजवरील दहीहंडी फोडून आदरणीय बाबाराजे यांनी आनंद घेतला. या कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे भाऊ डीसीसी बँक संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब पंचायत समिती सभापती सौरभ बाबा शिंदे उपसभापती गोरख महाडिक बाजार समिती सभापती जयदीप शिंदे संचालक हनुमंत शिंगटे मेढ्याच्या नगराध्यक्ष रूपालीताई वारागडे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे बांधकाम सभापती शिवाजी देशमुख आरोग्य सभापती नितीन मगरे महिला बालकल्याण सभापती आनंदी ताई करंजेकर नगरसेवक शिवाजी गोरे रिकी तिवाटणे सुशांत कांबळे धनंजय पवार नगरसेविका सुनीता तांबे तेजस्वी इगावे अनघा करंजेकर पुष्पा मुकणे माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे तालुकाध्यक्ष संदीप परमने मारुती चिकने युवा नेते संतोष वारागडे किरण ढेबे दत्ता वारागडे पांडुरंग जवळ दत्तात्रय पवार चंद्रकांत दळवी गणेश खताळ समीर पवार संकेत करंजेकर अक्षय करंजेकर गणेश ताटे अरुणबापू जवळ सोमनाथ देशमुख सुमित सपकाळ संजय सपकाळ बळवंत पाडळे गुरुजी संतोष करंजेकर निखिल ओतारी सर्वेश ओतारी रोहित देशमुख मोहनबापू वारागडे मोहसीन शेख पप्पू निकम अभिजित जवळ श्री मिस्त्री मधुकर शेलार दादा शेलार राहुल मानकर विनोद वेंदे आणि भारतीय जनता पार्टीचे व मेढा नगरपंचायत चे आजी-माजी पदाधिकारी मेढातील युवक युवती महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सामील झाले होते..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार सर नगरसेवक शिवाजी गोरे किरण ढेबे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी नगरपंचायत चे आजी-माजी पदाधिकारी व मेढ्यातील युवा वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य

Live Cricket