Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई तालुक्यातील ५० दुर्गम गरजु जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ई-लर्निंग प्रोजेक्टर मिळवून देणारे संदीप रांजणे यांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार

वाई तालुक्यातील ५० दुर्गम गरजु जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ई-लर्निंग प्रोजेक्टर मिळवून देणारे संदीप रांजणे यांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार

वाई तालुक्यातील ५० दुर्गम गरजु जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ई-लर्निंग प्रोजेक्टर मिळवून देणारे संदीप रांजणे यांचा मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार

वाई -(संजीव वरे)स्व.किसन तथा आबासाहेब वीर यांच्या १२१ व्या जयंती औचित्य साधून वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात, कुसगाव (विठ्ठलवाडी) येथील संदीप रांजणे यांचा मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वाई तालुक्यातील दुर्गम व गरजू जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी त्यांनी ५० ई-लर्निंग प्रोजेक्टर मोफत मिळवून दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती पै. विक्रांतभैया डोंगरे, उपसभापती सौ. वर्षा जगताप, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, श्रीमती वृषाली चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य शैलेश सपकाळ, सदस्या राणी कांतीलाल पवार आणि माजी नगरसेवक चरण गायकवाड, सत्यजित वीर, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाई तालुक्यातील दुर्गम व गरजु भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने संदीप रांजणे यांनी १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ई-लर्निंग प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले आहेत. या शाळांच्या अचूक निवडीसाठी जेष्ठ पत्रकार संजीव वरे आणि शिक्षक गुरुनाथ राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले. रांजणे यांच्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षणाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले असून, या सामाजिक योगदानाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १० रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य

Live Cricket