एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे साताऱ्यात मोफत BMD तपासणी शिबिर
सातारा : श्री एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, सातारा यांच्या वतीने हाडांच्या ठिसूळपणाची (Bone Mineral Density – BMD) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे होणार आहे.
ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा वेळेत ओळखण्यासाठी ही तपासणी उपयुक्त ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिक, रजोनिवृत्तीनंतरच्या महिला, कॅल्शियमची कमतरता असलेले रुग्ण, वारंवार पाठदुखी, सांधेदुखी किंवा हाडे दुखण्याचा त्रास असणारे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओपीडीसाठी येणारे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही या मोफत तपासणीचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीसाठी ०२१६२-२२७२२९ / ९९२१९९८००० या क्रमांकावर, तर हेल्पलाईनसाठी ९१६८४३२४३२ येथे संपर्क साधावा.




